विजय पाष्टे - लेख सूची

स्त्री आणि पुरुष – शॉर्टफिल्म

स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात काही चुंबक (मॅग्नेट) नसतो. पण तरीही ते एकमेकांकडे कसे आकर्षित होतात? स्त्री आणि पुरुष यांच्यातील याच निसर्गनिर्मित अनंत आकर्षणाची आणि मानवनिर्मित अथांग राजकारणाची गोष्ट विनोदी पद्धतीने सांगणारी ‘स्त्री आणि पुरुष’ ही अवघ्या दहा मिनिटांची शॉर्टफिल्म खालील लिंकवर विनामूल्य पहा. https://www.mxplayer.in/movie/watch-stree-and-purush-short-film-movie-online-23b8f449f024f4dd9b22431ec250fa67

पटरी

मुंबई. घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारं, ऐन रात्रीतही टक्क जागं राहत कधीच न झोपणारं शहर. स्वत:चं हे वेगळेपण जपण्यासाठीच का माहीत नाही, नेहमीप्रमाणं आजही ते झोपलं नव्हतं. याच जागरणं करणाऱ्या मुंबईतला सेंट्रल गव्हर्नमेंट हाऊसिंग कॉलनीमुळे सुप्रसिद्ध असलेला अँटॉप हिल विभाग. त्यालाच खेटून असलेली बांडगुळासारखी वाढत गेलेली कुप्रसिद्ध समजली जाणारी अँटॉप हिल झोपडपट्टी. रात्रीच्या म्हणा किंवा मग …